नाशिक जिल्ह्यात सीमेवर मालेगाव तालुक्यात एक किल्ला आहे, याचे नाव कंक्राळा किल्ला. गाळणा किल्ल्याचा सखा सोबती हा कंक्राळा किल्ला.
Kankrala Fort, Kankrala Fort Trek, Kankrala Fort Trekking, Nashik
गडावरील पहाण्याची ठिकाणे
खिंडीच्या अलिकडे उजव्या बाजूच्या कातळ भिंती मध्ये एक सुमधुर असे पाण्याचे टाके आहे. याच्याच जवळ झाडावर एक भगवा ध्वज देखील फडकत असतो. खिंड ही कंक्राळ्याच्या डोंगरामुळेच तयार झालेली असल्यामुळे या खिंडीत तटबंदीचे अवशेष दिसतात. ही तटबंदी आता मात्र बर्याच मोठ्या प्रमाणावर ढासळलेली आहे. तटबंदीच्याच वरच्या भागात पाण्याची एक ते दोन टाकी आढळतात. संपूर्ण गडमाथ्यावर पाण्याची टाकी बरीच आहेत. काही ठिकाणी वाड्यांचे चौथरे दिसतात. एका ठिकाणी उघड्यावर हनुमानाची मूर्ती पडलेली दिसते. सर्व किल्ल्याचा फेरफटका मारण्यास अर्धा तास पुरतो. कंक्राळ्याहून गाळण्याचा किल्ला समोरच दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
नाशिक मार्गे मालेगावला यावे. मालेगावहून डोंगराळे कडे जातांना मालेगाव पासून ३० कि.मी अंतरावर करंजगव्हाण नावाचे गाव आहे. या गावा पासून ८ ते १० किमी अंतरावर कंक्राळा गाव आहे. मालेगावहून करंजगव्हाण पर्यंत जाण्यास जीपगाड्या मिळतात. कधी कधी काही गाड्या थेट कंक्राळ्या पर्यंत सुध्दा जातात. कंक्राळा गावातून किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. कंक्राळा गाव ते किल्ला यामध्ये बरेच अंतर आहे. किल्ल्याचा पायथा गाठण्यासाठी किमान दोन कि.मी पायी तंगडतोड करावी लागते.पायथ्याला फक्त एक दोन घरांची वस्ती आहे. कंक्राळ्याच्या डोंगरांमुळेच किल्ल्याच्या मध्ये एक खिंड झाली आहे. वस्ती पासून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो. वाट मळलेली असल्याने चुकणे अशक्य आहे.
राहाण्याची सोय
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
कंक्राळा गावातून अर्धा तास लागतो.