हाराष्ट्रातील सर्वोत्तम किल्ले ट्रेकर्स ग्रुप मध्ये आपले स्वागत आहे.

विश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली. इतिहासातील शिवछत्रपतींच्या शौर्याची गाथा कानी पडली आणि त्या स्फूर्तीतून ८ - ९ वर्षांपूर्वी आम्ही या कार्यास प्रारंभ केला. आम्ही साधारण २००७ पासून ट्रेकिंग करण्यास सुरवात केली आम्ही ३० - ३२ ट्रेक यशस्वी पणे केल्या नंतर आम्ही फोर्ट ट्रेकर्स ( Fort Trekkers ) म्हणून ग्रुप ची स्थापना केली आणि आता त्या ग्रुप मार्फत आम्ही ट्रेकिंग करण्यास सुरवात केली. स्वराज्यातील गड किल्ले जवळून अनुभवण्याचं चंगच आम्ही बांधला.

गड किल्ले सर करणे, ट्रेकिंग करणे जणू आमचा छंदच झाला आहे. आणि त्याबद्दल रुची आणि आवड निर्माण झाली आहे. ट्रेकिंग हा एक साहसी छंद आहे ज्याला निसर्गाची आवड आणि शिवाजी महाराजांचा आदर आहे असेच लोक करू शकतात. ट्रेकिंग एक छंद म्हणून मानले जाऊ शकते, त्यामुळे मानसिक आणि आरोग्य दोन्ही फायदे होऊ शकतात. ट्रेकिंग तणावमुक्त म्हणून कार्य करते आणि त्यामुळे आपल्याला उदासीनतांवर मात करण्यास मदत होऊ शकते. ट्रेकिंग मुळे आपली हिम्मत आणि स्वतःवरचा विश्वास वाढवते.

आजच्या तरुण पिढीला शिवछत्रपतींच्या शौर्याची ओळख व्हावी, निसर्गाविषयी आदर निर्माण व्हावा, सामाजिक भान जागृत असणारे सुजाण सुसंस्कृत नागरिक समाजात निर्माण व्हावे हे एकच उद्दिष्ट घेऊन आम्ही आमची वाटचाल सुरु केली आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रा मधील सर्व किल्ले करणे. महाराष्ट्र ट्रेकिंग साठी उत्तम ठिकाण आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असे बरेच किल्ले बघण्यासारखे आणि ट्रेकिंग साठी खूप छान आहेत. आम्ही महाराष्ट्रातील विस्तीर्ण सह्याद्रीच्या उंच उंच पर्वत रांगा, घनदाट जंगल, नद्या व धबधबे, दगडी बांधकाम आणि किल्ले पाहण्यासाठी फोर्ट ट्रेकर्स ग्रुप ची स्थापना केली.