अचला किल्ला Achala Fort – ४०४० मीटर उंचीचा अचला हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगांमधील ट्रेकच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा किल्ला आहे.
Achala Fort, Achala Fort Trek, Achala Fort Trekking, Nashik
अचला किल्ला अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे अथवा मनमाडमार्गेही या किल्ल्यावर जाता येते. गुजरातहून सापूतारा मार्गेदेखील जाता येते.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडमाथा अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे गडावर फारसे पाहण्यासारखेही काही अवशेष नाहीत. गडावर पाण्याची एक दोन पाण्याची टाकी आहेत. याशिवाय भग्नावस्थेत असणारे छोटेसे मंदिर आहे. गडमाथा फिरण्यास साधारण २० मिनिटे पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा
नाशिकमार्गे: नाशिकमार्गे वणी गाठावे. एस.टी.ने पिंपरी-अचलाकडे जायचं. हे अंतर साधारण १२ कि.मी. चे आहे. अचला गावात उतरून पिंपरीपाडा गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्धा तासाचे आहे. पिंपरीपाडा हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत एक छोटेसे देऊळ दिसते. त्याच्या दिशेने वर चढत जाव. देवळ्यापासून डाव्याबाजूला दिसणारा किल्ला अचला तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट अहिंवतला जाऊन मिळते. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाटा पकडावी. पुढे ही वाट कडा डावीकडे ठेवून त्याला चिटकून वर जाते. पुढे कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. खिंडीतून माथा गाठण्यास दीड तास पुरतो.
बेलवाडी: दुसरी वाट बेलवाडी गावातून किल्ल्यावर येते. बेलवाडी हे अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. ही वाट पिंपरील अचला गावामधून येणाऱ्या वाटेला देवळापाशी येऊन मिळते.
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. येथे जेवण्याची सोय देखील स्वतःला करावी लागते तसेच किल्ल्यावर पाणीसुद्धा फेब्रुवारी महिन्यापर्यंतच असते,किल्ल्यावर जाण्यासाठी पिंपरी-अचलामार्गे अडीच तास लागतात.