रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यात दोन किनारी दूर्ग आहेत ते म्हणजे आंबोळगड व यशवंत गड. "मुसाकाजी" या प्राचिन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली.

Ambolgad Fort, Ambolgad Fort Trek, Ambolgad Fort Trekking, Ratnagiri

गडावरील पहाण्याची ठिकाणे

आंबोळगड हा उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहिर व वाड्यांची जोती आहेत. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

रत्नागिरीहून आडीवरे- नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.

राहाण्याची सोय

गडावर राहण्याची सोय नाही, पण जवळील गगनगिरी महाराजांच्या आश्रमात होऊ शकते.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय नाही, पण जवळील गगनगिरी महाराजांच्या आश्रमात होऊ शकते.

सूचना:
१) गणपतीपुळ्याला राहून स्वत:च्या वाहनाने जयगड, यशवंतगड, आंबोळगड, एका दिवसात पाहता येतात.

२) रत्नागिरीला राहून स्वत:च्या वाहनाने रत्नदुर्ग, पूर्णगड, जयगड, यशवंतगड, आंबोळगड दोन दिवसात पाहता येतात.