मुंबई - पुण्याहून एका दिवसात करता येण्यासारखा एकदम सोपा किल्ला म्हणजे भिवगड उर्फ भिमगड कर्जत जवळील वदप व गौर कामत गावामागे छोट्याश्या टेकडीवर हा किल्ला आहे. ‘‘ढाक’’ ला जाण्याचा मार्ग वदप गावातून आहे. या मार्गावर भिवगडच्या खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूची वाट ‘‘ढाक’’ला जाते, तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते.

Bhivgad / Bhimgad Fort, Bhivgad / Bhimgad Fort Trek, Bhivgad / Bhimgad Fort Trekking, Raigad

भिवगड फारच छोटा किल्ला असल्यामुळे ‘‘ढाक’’ला जाता जाताही वाट वाकडी करुन पाहाता येतो. ज्यांना फक्त भिवगडच पाहायचा आहे त्यांनी पावसाळ्यात जावे; म्हणजे छोटेखानी किल्ला पाहून वदप गावामागे असलेला धबधबाही पाहता येईल.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

मंदिराच्या जवळच अर्धा किलोमीटर अंतरावर भिवगडाचा किल्ला आहे. याच्या छोट्याशा माथ्यावर जाण्यासाठी दोन्हीकडून मार्ग आहेत. किल्ल्याच्या पूर्वबाजूला पाण्याचा वेढा आहे तर पश्चिम बाजूला जंगलाचा वेढा आहे.

पाण्यामध्ये एका महालाचे अवशेष दिसतात. नावेमधून तेथे जाता येते. पावसाळ्यात त्याचा पहिला मजला पाण्याखाली असतो. पाणी कमी झाल्यावर चालतही तेथपर्यंत जाता येते.

या महालाला दोन मजले आहेत. खालच्या मजल्यामध्ये तीन खोल्या असून त्यांची प्रवेशद्वारे अगदी लहान आहेत. एका खोलीतून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. वरच्या मजल्यावरुन धरणाचा परिसर आणि किल्ला न्याहाळता येतो. या वास्तुला स्थानिक लोक राणीचा महाल म्हणतात.

महालाकडून भिवगडाच्या डोंगराकडे जाता येते. इकडून साधारण दोनशे मीटरची चढाई आहे.भिवगडाची तटबंदीही रचिव दगडांची आहे. त्यातच एक खिडकीवजा दरवाजातून आपण गडात प्रवेश करतो. गडाच्या दक्षिण भागात रचिव दगडांची तटबंदी बांधलेली असून त्याला रचिव दगडांचा बुरुजही आहे. प्रवेशद्वार मात्र नष्ट झालेले आहे. गडावरील पाण्याची टाकी मात्र बुजलेली आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

कर्जतहून ५ कि.मीवर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ कि.मीवर गौरकामत गाव आहे. या दोन गावांच्या मध्ये भिवगड आहे. वदप गावातून गौरकामत गावाकडे जाताना धबधब्याच्या फाट सोडल्यावर पुढे उजव्या हाताला एक कच्चा रस्ता भिवगडकडे जातो. कच्चा रस्ता संपल्यावर इलेक्ट्रीच्या खांबाच्या बाजूने जाणार्‍या पायवाटेने भिवगड डावीकडे ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण भिवगडच्या खिंडीत येतो. येथे दोन वाटा फुटतात उजव्या बाजूची वाट ‘ढाक’ कडे तर डाव्या बाजूची वाट भिवगडवर जाते. खिंडीतुन १० मिनिटात गडावर जाता येते. गौर कामत गावातूनही एक वाट भिवगडवर जाते. डोंगराच्या सोंडेवरुन भिवगडवर जाता येते.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही, पण वदप गावात रहाण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही, पण वदप गावात जेवणाची सोय आहे.

पाण्याची सोय

गडावरील टाक्यात जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ

वदप गावातून ३० मिनिटे लागतात.