बितनगड हा किल्ला कळसूबाईच्या डोंगर रांगेत पुर्वेला आहे. ह्या पूर्व रांगेत आणखीन असणारे किल्ले म्हणजे औंढा, पट्टा, आड आणि म्हसोबाचा डोंगर. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. पहाण्याची ठिकाणे : किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. बितनगड किल्ल्याचे राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) हुन छायाचित्र. बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) च्या पुर्वेला आहे. या किल्ल्याला बिताका ही म्हणतात. तो कळसुबाई व पट्टागड यांच्यामध्ये आहे. बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) च्या पुर्वेला आहे. या किल्ल्याला बिताका ही म्हणतात. तो कळसुबाई व पट्टागड यांच्यामध्ये आहे.

Bitangad Fort, Bitangad Fort Trek, Bitangad Fort Trekking, Nashik

गडावर जाण्याच्या वाटा

घोटी - भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. या गावातून एकदरा फाटा अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. एकदरा फाट्यापासून बितनगडाच्या पायथ्याचे बितनवाडी गाव ६ किमीवर आहे. गडाच्या पायथ्याशी बितंगवाडी हे गाव आहे. या गावातून किल्ल्याकडे जाता येत. शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. किल्ला चढायला कठीण नाही, पण खडकात खोदलेल्या पायर्या चढताना नीट चढून जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोरी (रोप) असू द्यावी. पावसाळ्यात शेवाळ्यामुळे पायर्या निसरड्या होऊ शकतात. नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.

पहाण्याची ठिकाणे

किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.

राहाण्याची सोय

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.बितंगवाडीत राहता येतं. टाकेद (बितंगवाडी पासून सुमारे १५ किलोमीटर) या गावातील जटायूच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.