कुलाबा किल्लाच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी वादविवाद आहेत, ग्रॅण्ट डफ या इंग्रज इतिहासकाराने लिहिलेल्या ‘मराठाज्’ या ग्रंथातील (पान क्र. ८५) नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६६२ च्या सुमारास नव्याने बांधून मजबूत केला तर रियासतकारांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळात सुरू होऊन त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस पूर्ण झाले.

Colaba Fort, Colaba Fort Trek, Colaba Fort Trekking, Raigad

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी कुलाबा किल्ल्याची आपली राजधानी म्हणून निवड केली होती.कुलाबा किल्ल्यावर गडदेवता भवानी देवीचे मंदिर आहे.गडदेवता भवानी देवीच्या देवळातच गणेश आणि वेताळ यांच्याही मूर्ति आहेत.देवळासमोरच साडेसात मीटर उंचीचा दीपस्तंभही आहे,आंग्रे मोहिमेवर निघण्यापूर्वी भवानी देवीचा कौल घेत असत.

आंग्रेच्या कौल मिळालेल्या सर्व मोहिमा यशस्वी झाल्याचा इतिहास असल्यामुळे आजचे कोळी बांधव दर्यात मासळी पकडण्यास जाण्यापूर्वी भवानी देवीचा कौल घेतात.किल्ल्यात ओहोटीच्या वेळी चालत जाता येते आणि भरतीच्या वेळी बोटीतून जाता येते त्यामुळे भरती-ओहटीच्या वेळा लक्षात ठेवाव्या गडाच्या तटबंदीवरून चालत गड पाहता येतो.बुरूजावर लोखंडी चाकाच्या दोन मोठ्या तोफा आढळतात.बुरूजावरून खांदेरी-उंदेरी किल्ल्याचे दर्शन होते.

गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था कुलाबा किल्ला अलिबागच्या समुद्रकिनार्‍यापासून तीनशे मीटरवर आहे.गडावरील गणेश मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते,गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.जेवणाची सोय स्वत: करावी.