नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात देहेर किल्ला आहे. रामसेज या प्रसिध्द किल्ल्याच्या पुर्वेस असणार्‍या देहेरगडाचा उपयोग मुख्यत: टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. गडावरील पाण्याची टाकं व दगडात खोदलेले पायर्‍यांचा मार्ग किल्ल्याचे प्राचिनत्व सिध्द करतात. पेठ - सावळघाट - दिंडोरी या पुरातन व्यापारी मार्गावरल लक्ष ठेवण्यासाठी देहेरगडाची निर्मिती करण्यात आली असावी. देहेरगड ‘भोरगड’ या नावानेही ओळखला जातो.देहेरगड जरी भोरगड या नावाने ओळखला जात असला तरी, दहेरगड आणि भोरगड हे दोन वेगवेगळे किल्ले आहेत.पण दॊन्ही किल्ले एकमेकांना लागूनच आहेत.यापैकी भोरगडावर एअरफॊर्सने रडार बसविलेले आहे त्यामुळे तिकडे जाण्यास मनाई आहे.

Dehergad / Bhorgad Fort, Dehergad / Bhorgad Fort Trek, Dehergad / Bhorgad Fort Trekking, Nashik

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण देहेरगडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला पाण्याचे सुकलेल टाक आहे. या टाक्याच्या मागून असलेला पायर्‍यांचा मार्ग आपल्याला गडाच्या पूर्वेला घेऊन जातो. येथे पाण्याची ३ टाकं आहेत; त्यांच्या जवळच उघड्यावर शिवलिंग आहे. कालौघात येथील मंदिर नष्ट झालेल आहे. गडाच्या दक्षिणेला व पश्चिमेला ३ - ३ जोड टाकं आहेत. गडमाथ्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा

नाशिक - धरमपूर मार्गावर आशेवाडी गाव आहे. आशेवाडीच्या पुढे ४ किलोमीटरवर देहेरवाडी, या देहेरगडाच्या पायथ्याला असणार्‍या गावाला जाणारा फाटा आहे. देहेरवाडीतून डोंगराच्या सोंडेवरुन साधारण १ तासात किल्ल्यावर जाता येते.

दहेरगड आणि भोरगड हे दोन वेगवेगळे किल्ले आहेत.पण दॊन्ही किल्ले एकमेकांना लागूनच आहेत.यापैकी भोरगडावर एअरफॊर्सने रडार बसविलेले आहे त्यामुळे तिकडे जाण्यास मनाई आहे. विशेष म्हणजे या भोरगडावर जाणारा रस्ता हा दहेरगडाला वळसा घालून जातॊ आणि वाटेत एक खिंड लागते, तिथे उतरून आपण पायवाटेने किल्ल्यावर जाऊ शकतॊ. पण मुळातच गाडीरस्ता आपल्या सारख्या ट्रेकर्ससाठी बंद केल्यामुळे आपल्याला या मार्गाने जात येत नाही.त्यामुळे दहेरवर जाता येत नाही अशी आपली गल्लत होते. पण दहेरवर जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे आशेवाडीच्या पुढे ७ कि.मी वर रासेवाडी लागते. रासेवाडीच्या अलिकडे एक कच्चा रस्ता दहेरवाडीपर्यंत जातो तिथून दोन तासात आपण दहेरगडावर पोहोचू शकतात. मुळात म्हणजे दहेरवर जाण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज लागत नाही.

राहाण्याची सोय

गडावर राहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

देहेरवाडीतून एक तास लागतो.