देवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत. मातीचा मागमूसही नसलेल्या ठिकाणी कातळामध्ये खड्डे काढून त्यात बाहेरून माती आणून रोपे लावली असून प्रसंगी माणसाकडून खांद्यावरून मिळेल तेथून पाणी आणून ही झाडे जतन केली आहेत. इथल्या शेतक-याने विज्ञानाची कास धरून आंब्यावर वेगवेगळे प्रयोग केले असून त्यामुळे उत्पन्न आणि दर्जा वाढवण्यास मदत झाली आहे.

Devgad Fort, Devgad Fort Trek, Devgad Fort Trekking, Sindhudurg

देवगडच्या जवळच वाडा येथे विमलेश्वराचे देऊळ प्रसिध्द आहे. मागे उंच डोंगर. समोर वाहता ओढा, आणि दोन्ही बाजूला गर्द झाडी. डोंगराच्या पायथ्याशी संपूर्ण दगडात कोरीव काम केले असून ते पांडवकालीन असल्याची लोकांची समजूत आहे. देवळातील पिंडी वैशिष्टयपूर्ण आहे. मुंबई-देवगड अंतर ४८० किलोमीटर. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावहूनही देवगडला जाता येते. अंतर ५०-५५ किलोमीटर. वाडानर खाडी देवगडपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे. गावातून टेकडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. टेकडीच्या सुरुवातीच्या भागात दाट वस्ती आहे. या वस्तीतच डाव्या बाजूला एक गल्ली जाते, या गल्लीच्या टोकाला सुटा बुरुज आहे. वस्ती संपल्यावर बालेकिल्ल्याकडे जातांना उजव्या बाजूला २ सुटे बुरुज आहेत. हे तीनही टेहळणी बुरुज असून त्यांचा उपयोग समुद्रावर, बंदरावर व आजूबाजूच्या परीसरावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. टेकडीवरील पठारावरून बालेकिल्ल्याकडे जातांना आपल्याला प्रथम बालेकिल्ल्याची पूर्व पश्चिम पसरलेली तटबंदी व त्यातील ३ बुरुज दिसतात. देवगड किल्ल्याला ३ बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. चौथ्या म्हणजेच टेकडीच्या बाजूने संरक्षण देण्यासाठी कातळात ३ मीटर रुंद व २.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे. या खंदकाच्या एका बाजूवर तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची उंची वाढलेली आहे. इतर किल्ल्यांच्या खंदकाप्रमाणे या खंदकात पाणी साठवले जात नव्हते. कातळात खोदलेल्या या खंदकातील दगड (चिरे) वापरून गडाची तटबंदी व बुरुज बांधलेले आहेत.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मह्त्वाचे शहर आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा इत्यादी ठिकाणांहून देवगडला थेट बस सेवा आहे.

२) मुंबई - गोवा महामार्गावरील नांदगाव येथे उतरून तेथून एसटी आणि ६ आसनी रिक्षांनी देवगडला जाता येते.