इरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे. पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते.

Irshalgad Fort, Irshalgad Fort Trek, Irshalgad Fort Trekking, Thane

इतिहास

तसे म्हटले तर या इरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे कारण इरशाळ हा एक सुळकाच आहे. त्यामुळे इतिहासातही त्याचा फार असा कुथे उल्लेख नाही. मे१६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. इरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटाना घडली ती म्हणजे, कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारील मुंबई-ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माची पासून गडावर जातांना, वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत. तेथून पुढे सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडपाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगद हा परिसर दिसतो.

इरशाळावाडीत ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गडावर जेवणाची सोय नाही, स्वःताच जेवणाची सोय करावी लागते. मार्च पर्यंतच गडावरील टाक्यात पाणी असते इतर वेळी स्वतः पाण्याची सोय करावी लागते. जाण्यासाठी इरशाळवाडीतून एक तास लागतो.

सूचना: अतिकठीण (गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे) १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.