सूवर्णदुर्गच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत हर्णे गावाच्या किनार्‍यावर दुर्गत्रयी बांधण्यात आली, ती म्हणजे गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड.यापैकी कनकदुर्ग हा समुद्रात घुसलेल्या एका प्रचंड कातळाच्या माथ्यावर उभारलेला छोटेखानी किल्ला आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ ५ हेक्टर आहे. कनकदुर्गाची उभारणी कोणी आणि केव्हा केली हे ज्ञात नाही.

Kanakdurg Fort, Kanakdurg Fort Trek, Kanakdurg Fort Trekking, Ratnagiri

गडावरील पहाण्याची ठिकाणे

किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. कातळमाथ्यावर किल्ल्याची थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. (किल्ल्यावर पाण्याचं टाकं आहे) किल्ल्यात दिपगृह आहे. पायर्‍यांच्या वाटेने जाताना डाव्या हाताला काळ्या पाषाणातील भक्कम बुरूज आहे. कनकदुर्गाच्या सभोवार असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मुंबईहून दापोली मार्गे १५ कि.मीवर असणार्‍या मुरुड हर्णेला जाता येते. हर्णेच्या समुद्रकिनार्‍यावर कनकदुर्ग किल्ला आहे.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही. हर्णे गावात, व दापोली येथे रहाण्याची सोय आहे.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही. हर्णे गावात, व दापोली येथे जेवणाची सोय आहे.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय नाही. हर्णे गावात, व दापोली येथे पाण्याची सोय आहे.

सूचना: मुरुड हर्णेला राहून सूवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड एका दिवसात पाहाता येतात.