पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. या समुद्रकिनाराच्या उत्तरेला सुरुच्या वनात केळवे किल्ला आहे. किल्ल्याचा आकार चांदणी प्रमाणे असून त्याचे बुरुज त्रिकोणाकृती आहेत.
Kelve Fort, Kelve Fort Trek, Kelve Fort Trekking, Thane
इतिहास
केळवे पाणकोटा प्रमाणे हा किल्ला सुध्दा इतिहासकालात समुद्रात होता. पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भूईकोटाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाढला गेला होता. ‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत २००८-०९ साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
किल्ला वाळूत गाढला गेला असल्यामूळे प्रवेशद्वारातून रांगतच आपण किल्ल्याच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश करतो. समोर तटबंदी व त्याच्या मधोमध दुसरे प्रवेशद्वार दिसते. त्यातून वाकून आत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या भागात पोहोचतो. किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी झरोके व जंग्या आहेत. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरावरुन उजव्या बाजूची वाट केळवे बीच कडे जाते. या वाटेने बीचवरुन किंवा सुरुच्या वनातून उत्तरेकडे चालत गेल्यावर आपण केळवे किल्ल्यावर पोहोचतो.
राहाण्याची सोय
गडावर राहण्याची सोय नाही, पण केळवे गावात आहे.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची व्यवस्था नाही, पण केळवे गावात आहे.
पाण्याची सोय
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ
केळवे शितलादेवी मंदीरापासून चालत १० मिनीटे लागतात.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



