पोलदपूरहून खेड - चिपळूणकडे जातांना कशेडी हा प्राचिन घाटमार्ग लागतो. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची उआर्णी करण्यात आली होती.

Kondhavi Fort, Kondhavi Fort Trek, Kondhavi Fort Trekking, Raigad

गडावरील पहाण्याची ठिकाणे

पोलादपूर जवळील कोंढवी गाव उर्फ तळ्याची वाडी येथे कोंढवी किल्ला आहे. गावात शिरल्यावर उजव्या बाजूने किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. यामार्गाने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण जिर्णोध्दारीत भैरव मंदिरापासी पोहोचतो. मंदिराच्या गाभर्‍यात ४ दगडी मुर्ती व एक अप्रतिम शिवलींग आहे. मंदिर डाव्या बाजूला ठेऊन सरळ चालत गेल्यावर पायवाटेला दोन फाटे फुटतात. त्यातील डाव्या बाजूची पायवाट पकडून १५ मिनीटांचा चढ चढून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर सुध्दा भैरवनाथाचे प्राचीन मंदिर असून याला "आठगाव भैरवनाथ " या नावाने ओळखले जाते. या मंदिराची महती अशी सांगतात की, या डोंगराच्या आजूबाजूच्या परीसरातील कोंढवी, तळ्याची वाडी,फणसकोंड,गांजण, खडपी, धामणदेवी कातली, खडकवणे व गोलदरा असी आठ गावे वसलेली असून या आठ गावातले गावकरी भैरवनाथाला आपले श्रध्दास्थान मानतात. त्यामुळे हे मंदिर "आठगाव भैरवनाथ " या नावाने ओळखले जाते.

या मंदिराच्या पुढे एक विटांनी बांधलेली खोली अहे. त्यात नवनाथांच्या मुर्ती अहेत. खोलीच्या मागच्या बाजूस ३ फूट X १.५ फूट आकाराचा एक कोरीवकाम केलेला दगड पडलेला आहे. तो दगड पाहून पुन्हा मुख्य वाटेवर येऊन १० पावले चालल्यावर हनुमंताची मुर्ती पाहायला मिळते. त्या मुर्ती पुढे काही अंतरावर दोन भग्न वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मुंबई - पुण्याहून कोंढवी गडावर जाण्यासाठी प्रथम मुंबई - गोवा मार्गावरील पोलादपूर हे गाव गाठवे. पोलादपूरहून कोंढवी / आदेशपूर फाटा ७ किमी अंतरावर आहे. फाट्यापासून कोंढवी गाव ३ किमी अंतरावर आहे. पोलादपूरहून खाजगी वाहानाने किंवा सहा आसनी रिक्षाने कोंढवी गावात जाता येते. कोंढवी गाव गडाच्या पाऊण उंचीवर असल्यामुळे येथून गडावर जाण्यास अर्धा तास पुरतो.

राहाण्याची सोय

गडावरील मंदिरात १० जण राहू शकतात.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही,मात्र गावात/पोलादपूरला जेवणाची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय

गडावर पाण्याचे टाके नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

गडावर जाण्यास अर्धा तास पुरतो.