मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते. या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो. कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणार्यावचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते.

Kulang Fort, Kulang Fort Trek, Kulang Fort Trekking, Nashik

पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्याल वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायर्याी आहेत. या पायर्याल चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.

कुलंगगडावर पाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारी पाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पहा याचेही सुरेख दर्शन होते. कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते.

गडावर अनेक घरांची जोती पहायला मिळतात. निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी एका पुर्ण दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. आल्यावाटेने खाली पदरामध्ये उतरुन मदनगडाकडे जाता येते अथवा परतीच्या वाटेवर निघता येते ते कुलंगगडाला पुन्हा येण्याचे ठरवूनच.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.

आंबेवाडी मार्गे: मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा – घोटी – पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला होय. येथून मदनवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात पायर्‍या लागतात.या पायर्‍या चढून गेल्यावर एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात.

घोटी – भंडारदरा मार्गे घाटघर: किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी – भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.

राहाण्याची सोय

गडावर एक गुहा आहे. यात साधारण ३० जण राहू शकतात.

जेवणाची सोय

जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय

किल्ल्यावर फक्त फेब्रुवारी पर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ

आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.