पुण्यापासून ९० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम कालावधी म्हणजे ऑक्टोंबर ते फेब्रुवारी. ऑक्टोंबर मध्ये पावसाळा नुकताच ओसरलेला असतो. सर्वीकडे हिरवेगार झालेले असते. अशा वातावरणात कोकणातील किल्ले पाहण्याची मजा काही औरच असते.

Kurdugad-Vishramgad Fort Trek, Kurdugad-Vishramgad Fort Trekking, Raigad

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर जातांना वाटेतच एक भग्नावशेष झालेला दरवाजा आढळतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच होय. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच १ मी. उंचीची हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. मूर्तीच्या मागच्या बाजूस एक निसर्गनिर्मीत घळ आहे. यात १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत. आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. किल्ल्यावर पाण्याची एक दोन टाकी आहेत. किल्ल्यावरून संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो. कुर्डुगडाचे स्थान हे फार मोक्याच्या ठिकाणी आहे. पुण्याहून कोकणात येणाऱ्या ताम्हणी घाटाच्या वेशीवरच हा किल्ला आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूस रायगड, कोकणदीवा हे किल्ले आहेत. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धातास पुरतो.

गडवावर जाण्याच्या वाटा

किल्ल्यावर जाण्याचे मुंबईकडून आणि पुण्याकडून दोन्ही बाजूने मार्ग आहेत.

१. पुणे मार्गे: पुण्याह्न मुळशी धरणाहून येणारा रस्ता ताम्हणी घाटमार्गे कोकणात उतरतो. ताम्हणी घाटातून एक रस्ता धाम्हणवळ मार्गे किल्ल्याच्या पठारावर येतो. जिते गावात उतरल्यावर ओढ्याच्याकाठाने थोडे पुढे जावे. थोड्याच अंतरावर एक प्रतिमा कोरलेला दगड आढळतो येथून डावीकडे वळावे. डावीकडची वाट शेतात जाते ती ५ मिनिटांनी समोरच्या डोंगराला येऊन मिळते. ही डोंगराची वाट सोडायची नाही. ती वाट पुढे वळणावळणाने पठारावर पोहचते. याच पठारवर ‘पेठवाडी’ नावाची वाडी आहे. जितेमधून इथपर्यंत येण्यास दीडतास पुरतो. वाट फारच दमछाक करणारी आहे. धाम्हणवळ मधून येणारी वाट सुद्धा पेठवाडी गावात येऊन मिळते. पेठवाडी गावात एक छान कुर्डाई देवीचे मंदिर आहे. जवळच पाण्यचे टाके आहे. मंदिराच्या जवळूनच उजव्या बाजूने किल्ल्यावर जाणारी वाट आहे.. येथून किल्ला वर जाण्यास अर्धा तास पुरतो.

२. मुंबई मार्गे: मुंबईहून एस.टी. ने किंवा कोकण रेल्वेने माणगावला यावे. माणगावातून जितेकडे जाणारी बस पकडावी आणि जिते गावात उतरावे किल्ला हा एका डोंगरावर वसलेला आहे. जिते हे डोंगराच्या पायथ्याचे गाव आहे.

किल्ल्यावर असणाऱ्या घळीत राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पेठवाडी गावातून अर्धातास लागतो.

राहाण्याची सोय

किल्ल्यावर असणाऱ्या घळीत राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय

जेवणाची सोय आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय

किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

किल्ल्यावर जाण्यासाठी पेठवाडी गावातून अर्धातास लागतो.