सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना सूपरीचित आहे. या आंबोलीत अनेक पहाण्याची ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे "महादेवगड" पॉंईंट. आंबोली गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्या पर्यंत डांबरी रस्ता आहे. किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी पारपोली घाटवर लक्ष ठेवण्यासाठी महादेवगड हा किल्ला बांधण्यात आला.

Mahadevgad Fort, Mahadevgad Fort Trek, Mahadevgad Fort Trekking, Sindhudurg

इतिहास

महादेवगड सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड सावंतांनी बांधला. एकेकाळी किल्ल्याला तटबंदी, बुरुज होते. तटबंदी भोवती खंदक होता, पण आज यापैकी काहीही अस्तित्वात नाही. किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत.गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड दिसतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाडी पासून ३२ किमी अंतरावर आहे. मुंबई पासून सावंतवाडी ५२१ किमीवर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते. आंबोली गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्या पर्यंत डांबरी रस्ता आहे. पुढे गडाच्या टोकापर्यंत चालत जाता येते.

राहाण्याची सोय

रहाण्यासाठी आंबोलीत हॉटेल्स आहेत.

जेवणाची सोय

आंबोलीत हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.