मोरागड किल्ला Moragad Fort – ४४५० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.

भौगलिक दृष्ट्या पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय.

Moragad Fort, Moragad Fort Trek, Moragad Fort Trekking, Nashik

इतिहास

इतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडमाथ्यावर जाताना दुसऱ्या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.

गडावर जाण्याच्या वाटा

मोरागडावर जाणारी वाट एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर जाते. मुल्हेरमाचीवर असणाऱ्या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भंडगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरगडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.

मोरागडावर राहण्याची सोय नाही. मात्र मुल्हेर आपण राहू शकतो. जेवणाची सोय आपण स्वतः करावी लागते. पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. मात्र गडावर उन्हाळ्यात पाणी नाही. गडावर जाण्यासाठी ४५ मिनिटे मुल्हेर पासून लागतात.