सह्याद्रीची बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगड एकच उजवा बाकी सर्व डावेच असे म्हणावे लागेल. हरिश्चंद्रगडाच्या एकदम समोर निमगिरी किल्ला आहे.
Nimgiri Fort, Nimgiri Fort Trek, Nimgiri Fort Trekking, Pune
पहाण्याची ठिकाणे
किल्ल्याच्या पायर्या प्रथम उजवीकडच्या डोंगरावर घेऊन जातात. दरवाजाच्याच बाजूला पहारेकर्यांच्या खोल्या आहेत. गडमाथ्यावर ४ ते ५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी काही टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. ही टाकी पाहून किल्ल्याचा फेरफटका मारायला निघायचे. थोडे चालून गेल्यावर उत्तर टोकाला काही गुहा आहेत. आतमध्ये एक खोली आहे. यात ५ त ६ जणांना मुक्काम करता येतो. हे पाहून गडाची सर्वात वरची टेकडी चढायला लागायचे. वाटेत पुन्हा खराब पाण्याची दोन टाकी लागतात. समोरच एक महादेवाचे मंदिर आहे. यात शिवाच्या डोक्यावर सोंड उगारलेल्या हत्तीचे शिल्प आहे. सर्वात वरच्या भागात काही घरांचे व वाड्र्यांचे अवशेष आहेत. येथून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. किल्ल्याच्या समोरच्या डोंगरावर २ पाण्याच्या टाक्र्यांशिवाय आणि गाडल्या गेलेल्या दरवाज्याशिवाय काहीच नाही. संपूर्ण किल्ला एक तासात फिरून होतो.
पोहोचण्याच्या वाटा
निमगिरीला जायचे असल्यास कल्याण – मुरबाड मार्गे नगर; आळेफाटा किंवा जुन्नर अशी कुठलीही एसटी पकडावी. पुण्याहून येणार्यांना जुन्नरशिवाय पर्याय नाही. माळशेज घाट पार केल्यावर दोन किमी वर खुबी फाटा आहे. त्याच्या पुढे ४ किमी वर वेळखिंड लागते. वेळखिंड संपली की पारगाव नावाचे गाव आहे. या पारगाव वरुन एक रस्ता उजवीकडे जातो. तो बोरवाडी – मढ मार्गे खांडेपाड्यार्पंत जातो. हाच रस्ता पुढे हडसरला पण जातो. पारगाव पासून खांडेपाडा ७ किमी वर आहे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रस्ता खूपच खराब असल्याने इथपर्यंत येण्यास कोणते वाहनही नाही. एसटी ची एक बस बोरवाडीला दुपारी २ वाजता येते. त्यानंतर मात्र कोणतेच वाहन येत नाही.
निमगिरी किल्ल्याचे दोन डोंगर आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून आहे. पाड्याच्या मागील बाजूला बाहेर पडल्यावर वाट एक छोट्याश्या पठारावर जाते. इथे मंदिराचे काही अवशेष दिसतात. त्र्यांच्या समोरच एक मोठे पाण्याचे टाकेही दिसते काही शिल्प इथं पडलेली आहेत. याच्याच वरच्या भागात काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर मुक्कामासाठी एकदम योग्य जागा आहे. मंदिराच्या समोरच्या झाडांमध्ये तीन समाध्याही पडलेल्या दिसतात. हे पाहून खिंडीच्या दिशेने निघायचे अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. यालाच घोड्याच्या पागा असेही म्हणतात. इथून पुढे जाणारी वाट कातळात खोदलेल्या पायर्र्यांची आहे. पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झाली आहे. या वाटेच्याच खाली एक वाट वळणा वळणाने खिंडीत जाऊन वरच्या पायर्यांपाशी जाते. या पायर्यांच्या साह्याने १० मिनिटात गडमाथा गाठता येतो.
राहाण्याची सोय
किल्ल्यावर राहण्यास गुहा आहेत. यात ५ ते ६ लोक राहू शकतात.
जेवणाची सोय
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
खांदेपाड्यापासून गडावर पोहोच्ण्यार १ तास लागतो.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



