छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर, युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्र्‍यांची साखळी तयार केली. मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली आणि काही जुने गड मजबुत केले. या किल्ल्र्‍यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणार्‍या शत्रुला राजधानीवर हल्ला करणे सहजसाध्य नव्हते.

Panhaledurg Fort, Panhaledurg Fort Trek, Panhaledurg Fort Trekking, Raigad

पन्हाळघरचा आटोपशीर आकार पाहाता, त्यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे रायगडाला जाण्याच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी / टेहाळणीसाठी केला गेला असावा. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला.

कसे जावे

मुंबई - गोवा महामार्गावर माणगाव व महाडच्या मध्ये माणगावपासून ८ किमी वर लोणेरे गाव आहे. लोणेरे गावातून पन्हाळघर हे पन्हाळघरच्या पायथ्याचे गाव ५ किमी वर आहे. पन्हाळघर गावातील बौध्दवाडीच्या मागे पन्हाळघर किल्ला आहे. बौध्दवाडीतून डोंगराच्या सोंडेवरुन साधारण अर्ध्या तासात किल्ल्यावर जाता येते.

रेल्वे: मानगड; पन्हाळघरला जाण्याचा स्वस्त पर्याय म्हणजे कोकण रेल्वे दिवा(०६:००) मडगाव पॅसेंजर १०:०० वाजता माणगावला पोहोचते. मानगड पाहून झाल्यावर लोणेरे गावाजवळील पन्हाळघर पाहून मडगाव दिवा पॅसेंजर (१७:०० वाजता) गोरेगाव स्थानकात पकडून परत येता येते.

बस: स्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे माणगावला पोहचल्यास मानगड, कुर्डूगड, पन्हाळघर एकाच दिवशी पाहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे

गडाचे बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नाही आहेत. तटबंदीचे काही अवशेष दिसतात. गडावर पाण्याची एकूण ४ टाकी पहायला मिळतात. गड पहाण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागतो.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही, लोणेरे आणि माणगाव येथे जेवणाची सोय आहे.

पाण्याची सोय

गडावर पिण्याचे पाणी आहे.

राहण्यासाठी खोल्या

गडाखालील पन्हाळघर गावातील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.