लहानशा दिसणार्‍या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते.

Peth-Kothaligad Fort, Peth-Kothaligad Fort Trek, Peth-Kothaligad Fort Trekking, Raigad

शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले.

हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले.फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकुन घेण्याचा अयशस्वी प्रयास केला;ज्यात तो आणि त्याचे सैन्य मारले गेले.

जेवणाची सोय

जेवणाची सोय आपणच करावी. पेठ गावात ‘कोथळागड’ नावाचे हॉटेल आहे.

पाण्याची सोय

गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.

राहण्यासाठी सोय

गडाखालील पन्हाळघर गावातील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.

कसे जावे

मुंबई - गोवा महामार्गावर माणगाव व महाडच्या मध्ये माणगावपासून ८ किमी वर लोणेरे गाव आहे. लोणेरे गावातून पन्हाळघर हे पन्हाळघरच्या पायथ्याचे गाव ५ किमी वर आहे. पन्हाळघर गावातील बौध्दवाडीच्या मागे पन्हाळघर किल्ला आहे. बौध्दवाडीतून डोंगराच्या सोंडेवरुन साधारण अर्ध्या तासात किल्ल्यावर जाता येते.

रेल्वे:

मानगड; पन्हाळघरला जाण्याचा स्वस्त पर्याय म्हणजे कोकण रेल्वे दिवा(०६:००) मडगाव पॅसेंजर १०:०० वाजता माणगावला पोहोचते. मानगड पाहून झाल्यावर लोणेरे गावाजवळील पन्हाळघर पाहून मडगाव दिवा पॅसेंजर (१७:०० वाजता) गोरेगाव स्थानकात पकडून परत येता येते.

बस:

स्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे माणगावला पोहचल्यास मानगड, कुर्डूगड, पन्हाळघर एकाच दिवशी पाहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

गडाचे बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नाही आहेत. तटबंदीचे काही अवशेष दिसतात. गडावर पाण्याची एकूण ४ टाकी पहायला मिळतात. गड पहाण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागतो.