किल्ले सदाशिवगडचा डोंगर सातारा जिल्ह्यातील कराड पासून ६ कि.मी.अंतरावर आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ३०५० फूट आहे,पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी (हजारमाची) या गावातून या डोंगरावर जाता येते. संपूर्ण रस्ता पायर्‍यांचा असून सुमारे १००० पायर्‍या आहेत.

Sadashivgad Fort, Sadashivgad Fort Trek, Sadashivgad Fort Trekking, Satara

सदाशिवगडचा डोंगर अफझल खान वधानंतर ( १० नोव्हेम्बर १६५९ )शिवछ्त्रपतींच्या ताब्यात आला.कराडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस-विटा कडे जाणार्‍या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने शिवछ्त्रपतींनी सदाशिवगड बांधून काढला.

सध्या गडावर महादेवाचे प्रशस्त मंदिर आहे,तिथे भाविकांचा नेहमी राबता असतो.समोर एक आड(विहिर) असून त्यात १२ महिने पाणी असते.शेजारीच मारुतीचे छोटेसे मंदिर आहे.बाकी गडावर किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत,काही ठिकाणी केवळ जोथेच शिल्लक आहेत.

संपूर्ण गडमाथा फिरण्यास ४५ मिनिटांचा कालावधी पुरतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मुंबई किंवा पुणे मार्गे कराडला पोहोचावे. कराडपासून ४ किमी अंतरावर ओगलेवाडी नावाचे गाव आहे. ओगलेवाडी गावातूनच किल्ल्यावर जाण्यास पायर्‍या आहेत. गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास साधारण पाऊण तास लागतो.

राहाण्याची सोय

गडावरील मंदिरात २५ जणांची रहाण्याची सोय होते.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय

गडावर असणार्‍या विहिरीत पिण्याचे पाणी मिळते.

जाण्यासाठी लागणारा वेळ

ओगलेवाडी गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास साधारण पाऊण तास लागतो.