सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा. डोंगररांगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. सर्व ठिकाणी वीज, दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. फलटणच्या माण तालुक्यात असणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.

Santoshgad Fort, Santoshgad Fort Trek, Santoshgad Fort Trekking, Satara

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक राहिलेला आहे. दरवाज्यामधील पहारेकऱ्यांचा देवड्या आजही सुस्थितीत आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत. धान्य कोठारांच्या भिंति उभ्या आहेत पण छप्पर उडालेले आहे. याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मात्र जवळ गेल्यावर समजते की खाली पाण्याचे टाकं आहे आणि टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळभिंतिला भोक पाडून पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावा असणारी संरक्षक तटबंदी, बुरुज आजही चांगल्या परिस्थित उभे आहेत. आजमितिस अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळलेल्या आढळतात. पण संतोषगड याला अपवाद आहे. किल्ल्याचा संपूर्ण परिसर भटकण्यास दोन तास पुरतात. किल्ला तसा छोटासाच आहे पण तटबंदी, बरुज असे पाहण्यासारखे बरेच काही आहे. गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे. पश्चिमेस मोळघाट, दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारूगड आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा दोन्ही शहरातून जाता येते. ताथवडे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस.टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ कि.मी. चे अंतर आहे. साताऱ्याहून पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणाऱ्या बसने ताथवडेला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३कि.मी. चे अंतर आहे. ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. ताथवडे गावात ‘बालसिद्धचे जीर्णोद्धार’ केलेले मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. गड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहे. या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते. गड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एकमठ आहे. या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते.

राहाण्याची सोय

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

जेवणाची सोय आपणच करावी.

पाण्याची सोय

किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

गडावर जाण्यासाठी ताथवडे गावातून अर्धा तास लागतो.