सप्तश्रुंगी किल्ला Saptashrungi Fort – ४६०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.

नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा ‘सप्तश्रुंगी गड’ हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला जातो. सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे.

Saptashrungi Fort, Saptashrungi Fort Trek, Saptashrungi Fort Trekking, Nashik

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

किल्ल्यावर जगदंबा मातेचे अर्थातच वणीच्या देवीचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा

किल्ल्यावर जाण्यासाठी नांदुरी गावातून गाडीरस्ता गेलेला आहे. वणी नांदुरी देवीचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

किल्ल्यावर जाण्यासाठी नांदुरी गावातून गाडीरस्ता गेलेला आहे. वणी नांदुरी दर अर्ध्यातासाला बसेस चालू असतात. नाशिकवरून थेट नांदुरी गाठून जीपने किल्ल्यावर जाता येते.

किल्ल्यावर राहण्यासाठी धर्मशाळा आहेत. जेवणासाठी किल्ल्यावर हॉटेल्स आणि भोजनालये आहेत. किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी नांदुरी गावातून अर्धातास लागतो.