शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट हे उपदूर्ग बांधले. त्यातील सर्जेकोट हा किल्ला कोळंबखाडीच्या मुखावर बांधलेला आहे. वेडीवाकडी वळणे असलेल्या कोळंबच्या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरुन ठेवली जात असत.
Sarjekot-Malvan Fort, Sarjekot-Malvan Fort Trek, Sarjekot-Malvan Fort Trekking, Sindhudurg
इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६८ मध्ये हा किल्ला बांधला.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
सर्जेकोट गडाच प्रवेशद्वार छोटस पण कमानदार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहे. आतल्या बाजूला घरे आहेत. त्यांच्या कडेने चालत गेल्यास आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्याचे चारही बुरुज व तटबंदी शाबुत आहे. प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. बालेकिल्ल्यात विहिर, तुळशी वृंदावन व तटावर जाण्याचे जिने आहेत. बालेकिल्ल्यात झाडी माजली असल्यामुळे इतर अवशेष दिसत नाहीत. किल्ल्याच्या समुद्राकडील बाजुची तटबंदी व बुरुज शाबुत आहेत.
गडावर जाण्याच्या वाटा
मालवणहून एसटीने सर्जेकोटला जाता येते. सर्जेकोट स्टॉपपासून १० मिनिटात चालत किल्ल्यावर पोहोचता येते. सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी सोसायटी पासून डाव्या हाताने जाणार्या रस्त्याने थेट किल्ल्यात जाता येते. मालवणहून रिक्षा ठरवूनही किल्ल्यावर जाता येते. मालवण - सर्जेकोट अंतर ४ किमी आहे.
राहाण्याची सोय
गडावर राहण्याची सोय नाही, पण मालवणात आहे.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची सोय नाही, सोय मालवणात आहे.
पाण्याची सोय
गडावर पाण्याची सोय नाही.
सूचना:
मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.