शिवथरघळीच्या निसर्गरम्य परिसराला रामदासस्वामींच्या वास्तव्याची पुण्याईही लाभली आहे. घळीच्या परिसरातल्या गावांमध्ये आजही वीज नाहीए, पण इथलं निसर्गसौंदर्य सर्वांना मोहित करतं. घळीसमोरचा धबधबा हाही पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद आहे. पावसाळ्यात त्याचं उग्र रूप पाहिल्यावर दडपायला होतं. या ठिकाणी प्रत्येकाने गेलंच पाहिजे.

Shivtharghal Fort, Shivtharghal Fort Trek, Shivtharghal Fort Trekking, Raigad

समर्थ म्हणतात: 'गिरीकंदरी सुंदर वन। सुंदर वाहती जीवन। त्यामध्ये सुंदर भवन। रघुनाथाचे।'

या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे नितांत सुंदर असा शिवथर घळीचा परिसर आहे. रायगड जिल्ह्यात लांबवर पसरलेल्या सह्यादीच्या पर्वतरांगामधल्या छोट्याशा डोंगरावर वाघजईच्या कुशीत हे ठिकाण आहे.

काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या काठावर कंुभे, कसबे आणि आंबे अशी तीन छोटी गावं वसली आहेत. या तीन गावांना शिवथर वस्त्या म्हणूनच ओळखलं जातं. सह्यादीच्या कुशीत घनदाट झाडांनी शिवथर परिसर वेढला आहे. काळ नदीच्या खोऱ्यात ही संुदर घळ आहे. समर्थ रामदास्वामींचा मठ या परिसरात होता. म्हणूनच या घळीला समर्थ 'सुंदर मठ'ही म्हणतात.

आजही शिवथर घळ परिसरातल्या कुंभे, कसबे आणि आंबे गावात जाण्यासाठी बसची सोय नाही. तसंच इथे दुसरं कुठलंही वाहन जाऊ शकत नाही. मुख्य रस्त्यावरून गावामध्ये जाण्यासाठी पायवाट आहे. गावामध्ये वीजही नाही. पावसाळ्यामध्ये या परिसराचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. भवताली हिरवागार पसरलेला परिसर मखमलीप्रमाणे भासतो. इथल्या डोंगरमाळावर पिवळ्या, पांढऱ्या, जांभळ्या रंगाची फुलं छान उठून दिसतात. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी तसंच निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड असणाऱ्यांसाठी शिवथर घळ चांगले ठिकाण आहे.

शिवथर घळीची उंची २९८५ फूट आहे. शिवाजी महाराजांचे कट्टर वैरी जावळीचे मोरे यांच्या वतनामध्ये शिवथर घळ आणि आसपासचा सर्व परिसर येत असे. जावळीचे मोरे हे विजापूरच्या मोघल दरबाराचे वतनदार होते. घनदाट झाडी आणि डोंगरांनी वेढलेल्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ ठरत होते. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून हा परिसर काबीज केला. समर्थ रामदास स्वामी अंदाजे १६४९मध्ये या घळीमध्ये वास्तव्यसाठी आले. पुढे दहा ते अकरा वर्षं ते या ठिकाणी राहत होते. 'दासबोध' या त्यांच्या ग्रंथाची रचनाही त्यांनी याच ठिकाणी केली.

शिवथर घळ गिरीदुर्गाचे सुशोभिकरण करण्यात आलं आहे. पर्यटकांना चढण्यास सोपं जावं यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. पायऱ्यांना दोन्ही बाजूला लोखंडी रॉडही बसवण्यात आले आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर समोरच 'शिवथर घळ संुदरमठ सेवा समिती'ची इमारत लागते. या इमारतीमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. शिधा दिल्यावर इथे जेवणाची सोयही होते. इमारतीवरून जाणारा रस्ता थेट घळीपाशी जातो. या घळीमध्ये बसून समर्थांनी दासबोध ग्रंथाची रचना केली. इथे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींची मूतीर् आहे. या मूतीर्ंच्या संरक्षणासाठी काचेचं तावदान बसवण्यात आलं आहे. यामुळे पर्यटकांना दर्शन घेता येतं आणि मूतीर्ंचं सौंदर्यंही टिकून राहतं. या घळीच्या समोर सुंदर धबधबा आहे. तिथल्या शांत परिसरात हा धबधबा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.

उन्हाळा आणि हिवाळ्यात या धबधब्याचं रूप अतिशय शांत आणि मनोहारी असतं. कानात गुजगोष्टी केल्याप्रमाणे किंवा एखाद्या नाजूक युवतीच्या मधाळ स्वरासारखं या धबधब्याचं रूप भासतं. याउलट पावसाळ्यात हा धबधबा उग्र रूप धारण करतो. लांबवरही या धबधब्याचा आवाज स्पष्ट येतो. घळीजवळ गेल्यावर या धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर येऊन क्षणार्धात आपल्याला ओलेचिंब करतात. शेजारी असलेला माणूस मोठ्याने आपल्या कानाशी ओरडला तरी त्याचा आवाज ऐकू येणार नाही इतका प्रचंड आवाज या धबधब्याचा असतो. धबधब्याचं उग्र रूप पाहण्याचा आनंद घेण्यासाठी खास सुरक्षा व्यवस्थाही केली आहे. लोखंडाचे बार डोंगराच्या कड्याला बसवण्यात आले आहे. घळीच्या वरच्या डोंगरसपाटीवर चंदराव मोरेंंच्या वाड्याचे भग्नावशेष पाहायला मिळतात. इथल्या डोंगर सपाटीवरून रायगड, राजगड, तोरणा आणि प्रतापगडाचं दर्शन होतं. शिवथर घळीपासून हे चार किल्ले समान अंतरावर आहेत.

शिवथर घळीच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष घळीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी जाऊन पोहोचतो.

शिधा आपण स्वत: दिला तर जेवणाची सोय देखील होते. बारामही पाण्याची सोय आहे.

कसे जावे

रेल्वे: महाड एक जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

बस: इथे जाण्यासाठी महाडवरून रस्ता आहे. महाड सोडल्यावर पुढे एखाद दोन किलोमीटर अंतर पार करण्याच्या आधी डावीकडे एक रस्ता जातो. तिथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. या रस्त्यावरून गेल्यावर पारमारची गाव लागते. या गावाहून ३० किलोमीटर अंतर पार केल्यावर आपण शिवथर घळीच्या पायथ्याशी पोहचतो. तसंच गोप्या घाट पार करून पुणेमागेर्ही येता येते. हा दुसरा मार्गही जरा अवघड आहे. पुण्याहून निघाल्यावर राजगड, भुतोंडे, बेळवंडी नदी, कुंबळ्याचा डोंगर पार करून गोप्या घाट पार करून कसबेमागेर् शिवथर घळीला पोहोचता येते. हा मार्ग जरा वेळखाऊही आहे.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे

पायर्‍या चढून आल्यावर समोरच ’शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’ ने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळी मधे श्री समर्थांची मूर्ती आहे. याच घळीत समर्थांनी दासबोध लिहिला. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळणारा मोठा धबधबा पाहून खरच स्वप्नात असल्यासारखे भासते. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत.

राहण्यासाठी खोल्या

येथे असणार्‍या शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीच्या इमारतीमध्ये पूर्व परवानगीने अनेक जणांच्या राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.