सुमारगड हा नावाप्रमाणेच सुमार आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागत. असा गोनीदांनी या किल्ल्याच्या बद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.

Sumargad Fort, Sumargad Fort Trek, Sumargad Fort Trekking, Ratnagiri

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

किल्ल्यावर पोहचल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या पोटातच एक गुहा आहे. यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर एकखांबी पाण्याचे टाके लागते. एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर एक टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यांपाशी येते. समोरच्या टेकडीला वळसा मारताना एका ठिकाणी दगडमातीने बुजलेली गुहा दिसते. या गुहेत दोन खोल्या आहेत. मात्र यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती जमा झालेली आहे. गडमाथा फारच लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो.

गडावर जाण्याचा वाटा

सुमारगडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. ही वाट एका खिंडीतून वर जाते. या दोन्ही वाटा एक खिंडीतच येऊन मिळतात. महिपत गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलट्या दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगराची दोन तीन घर लागतात. येथून थोडे खाली उतरल्यावर एक ओढा लागतो तो पार करून समोरचा डोंगर चढावा. पुढे अर्ध्या तासातच आपण एका खिंडीपाशी पोहचतो. खिंडीतून डावीकडे वर चढणारी वाट थेट सुमारगडावर घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर थोड्याच वेळात आपण एका कड्यापाशी पोहचतो. कड्याला लागूनच वाट पुढे जाते पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास फारच उत्तम, खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास पुरतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासाचे आहे.

राहाण्याची सोय

गडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

जेवणाची सोय नाही

पाण्याची सोय

पाण्याची सोय बारामही उपलब्ध आहे.