कल्याण, कर्जत व पनवेल या विभागात हा किल्ला आहे. ताहुलीला किल्ला किंवा गड म्हणणे तसे अयोग्यच. हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे. उंच बेलाग कडे, जाण्याच्या अवघड वाटा यामुळे ताहुली वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षितही आहे.
Tahuli Fort, Tahuli Fort Trek, Tahuli Fort Trekking, Thane
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
ताहुलीच्या पठारावर संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे. या वाटेत आणखी दोन आश्रम लागतात. पठाराच्या सर्वात वरच्या भागाला ‘दादीमा ताहुली’ म्हणतात. येथे ५ पीर आहेत. समोरच एक छोटेसे घर देखील आहे. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो. एका सुळक्याचे नाव ‘दाऊद’ तर दुसऱ्याचे नाव ‘बामण’ आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) अंबरनाथ वरून जाते. अंबरनाथवरून बाहेर पडून बदलापुरचा रस्ता ओलांडावा. थोड्याच वेळात काकुली नावाचा तलाव लागतो. या काकुली तलावापासून थोड्याच अंतरावा एक डोंगराची सोंड वर ताहुलीच्या तीन सुळक्यांपाशी पोहोचते. या वाटेने ताहुली पठार गाठण्यास ४ तास लागतात.
२) कुशीवली वरून कल्याण मलंगगड रोडवर कुशीवली गावाच्या स्टॉपवर उतरणे. गावाच्या बाहेरूनच थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी वाट ताहुलीला गेली आहे. ही वाट दोन डोंगराच्या बेचक्यातून वर चढते. कुशीवली गावापासून वर पठारावर जाण्यास अडीच तास लागतात.
गडावर राहण्याची सोय नाही. येथे जेवणाची सोय नाही, आपणच सोय करावी लागते. पाण्याची सोय नाही. जाण्यासाठी अडीच तास कुशीवली मार्गे व चार तास काकुली लेक मार्गे लागतात.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



